1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. marathi poem rain

का कोपला रे वरुण राजा, तुझ्या लेकरावरी

का कोपला रे वरुण राजा, तुझ्या लेकरावरी,
त्राहीमाम जाहले रे, अवघ्या पामरावरी,
हाहाकार उडला, झाले जलमय गावं,
रस्ता दिस न कुठं, न कशाला उरला वाव,
जीव मुठीत घेऊन सारे, कसेबसे आहेत उभे,
वाहून गेले घरकुल इवले,सांग काय करावे?
दशा मानवाची झालीया दारुण आता, न उरला थारा,
थांबव ना रे आता तरी, मिळू दे ना सहारा!
दैना आता जरा थांबव, घे जरा विश्रांती तू ही!
वाचवा या त्या जीवांना, दे सद्बुद्धी तू सकलना ही !
....अश्विनी थत्ते
पुढील लेख
ICSE, ISC board results 2021 शनिवारी दुपारी 3 वाजता होतील घोषित