नाशिकला जोरदार पावसाने झोडपले;२४ तासात गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत १३ टक्के वाढ

Last Modified शुक्रवार, 23 जुलै 2021 (08:10 IST)
नाशिक मागील अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान,अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात गेली आहे. रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे.अनेकांच्या घरात पाणी घुसलं असल्यानं नाशिक महापालिकेचा नाले सफाईच्या दाव्यातील फोलपणा चव्हाट्यावर आलाय. तर गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या २४ तासात १३ टक्के वाढ झाली.

राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून पावसाने पाठ फिरविली होती. परंतु मागील गेल्या तीन चार दिवसापासून पावासने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. या पावसाचा मोठा फटका त्र्यंबकेश्वरला बसला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठ जलमय झाली आहे तर त्र्यंबकेश्वर मंदिरातही पाणी शिरले आहे.त्र्यबंकेश्वरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

नाशिककरांना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे.
२४ तासांत गंगापूर धरण क्षेत्रात २३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 49.71 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या 24 तासात 13 टक्के वाढ झाली. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरु राहिला तर नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होऊ शकतं. नाशिकमध्ये पाणी कपात सुरु करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर
मुंबई पोलीस शिपाई भरती-२०१९ मध्ये आरक्षण नियमाला बगल देत ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला होता. ...

येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा , ...

येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा , नगरविकास विभागाचा निर्णय- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला ...

शेतकऱ्याने पुष्पगुच्छ नाही तर कोथिंबीरची जुडी भेट म्हणून ...

शेतकऱ्याने पुष्पगुच्छ नाही तर कोथिंबीरची जुडी भेट म्हणून दिली
एका शेतकऱ्याने आपले नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करत पुष्पगुच्छ नाही तर थेट कोथिंबीरची ...

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी 6 रोजी होत असून ...

ओबीसींना धक्का ! राजकीय आरक्षण देता येणार नाही : सुप्रीम ...

ओबीसींना धक्का ! राजकीय आरक्षण देता येणार नाही : सुप्रीम कोर्ट
गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राजकारण तापलेले असताना सुप्रीम ...