1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Khadakwasla dam is 96 percent full, citizens should be vigilant

खडकवासला धरण ९६ टक्के भरले, नागरिकांनी सतर्क राहावे असा दिला इशारा

मागील चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण क्षेत्रात झपाट्याने पाणीपातळीत वाढ झाली असून खडकवासला धरण ९६ टक्के भरले आहे. यामुळे १० हजार ९६ क्युसेकने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
 
पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, पुणे शहरावर पाणी संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊसामुळे धरण क्षेत्रात पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
 
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा
पानशेत – ६० टक्के
वरसगाव – ९१.९४ टक्के
टेमघर – ३६.७४ टक्के
खडकवासला – ९६.१७ टक्के
पुढील लेख
धनंजय मुडेंनी कवितेतून अजित पवारांना दिल्या शुभेच्छा