रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:22 IST)

18 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना 38 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 23 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मंगळवारी देण्यात येणार आहे. 8 वर्षापुढील नागरिकांचे कोविन ॲपवर 100 टक्के ऑनलाईन नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. तर,45 वर्षापुढील नागरिकांचे ‘ऑन द स्पॉट’ लसीकरण करण्यात येईल.उद्या सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन होणार आहेत. तर,18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 4 केंद्रांवर‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार !
 
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर,साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती,आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर,मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नेहरुनगर उर्दु शाळा, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, कासारवाडी दवाखाना,खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव,पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर,नवीन जिजामाता रुग्णालय,नताशा आय क्लिनीक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कुल काळेवाडी,फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस उद्या कोविशिल्डची लस मिळणार आहे.
 
तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. 23 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला,दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
हेडगेवार जलतरण तलाव, आरटीटीसी सेंटर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, दीनदयाळ शाळा पिंपरी,अजमेरा स्कुल अजमेरा, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी,नवीन भोसरी रुग्णालय,गणेश इंग्लिश स्कुल दापोडी,शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी,बालाजी लॉन्स जुनी सांगवी,महापालिका शाळा वाकड,यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग,महापालिका शाळा रहाटणी,कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग,महापालिका शाळा किवळे,बिलजीनगर दवाखाना,बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे,अश्विनी मेडिकल फाउंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड,कामत हॉस्पिटल आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे.
 
‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
18 वर्षापुढील नागरिकांना पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्याना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर 45 वर्षापुढील नागरिकांना पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल,फुलेनगर या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.