सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 5 जुलै 2021 (12:36 IST)

धक्कादायक ! पुण्यात दोन युवकांची निर्घृण हत्या

फोन वरून शिवीगाळी दिल्याने त्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणांची रागाच्या भरात येऊन काही लोकांनी पुण्यातील दोन तरुणांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. 
 
ही घटना दौंड तालुक्यात पाटस येथील तामखंडात रात्रीच्या सुमारास घडली असून शिवम संतोष शीतकळ वय वर्ष 23आणि गणेश रमेश मखर वय वर्ष 23 अशी ही मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 
 
फोन वरून शिवीगाळी का केली हा जाब विचारत असताना 5 अज्ञात इसमांनी या दोन्ही तरुणांची काठ्या, तलवार, आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे वृत्त समजले आहे.या घटनेमुळे पाटस मध्ये तणावाचे वातावरण आहे. घटने नंतर आरोपी पसार झाले आहे.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष आणि गणेश यांना काही इसम फोन वरून शिवीगाळ देत होते.आम्हाला शिव्या का देता असं जाब ते त्या आरोपींना विचारायला गेले असताना आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकून घेता धारधार तलवारीने त्यांच्या वर प्रहार करू त्यांना ठार मारले.पूर्ववैमनस्यातून या दोघांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.