1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (08:26 IST)

पुण्यात केवळ तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिले क्लिनिक सुरू

केवळ तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या क्लिनिकचा शुभारंभ नुकताच पुणे शहरात करण्यात आला आहे. शहरातील सुमारे ४ हजार तृतीयपंथियांना त्याचा लाभ घेता येणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना बहुतांश वेळा आरोग्य सुविधा,राहण्यासाठी घर मिळत नाही.त्यामुळे त्यांना काही काळ पदपथावर राहावे लागते. त्यामुळे या घटकला किफायतशीर दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सोनल दळवी यांनी दिली.
 
तृतीयपंथियांना खासगी रुग्णालयांचे दर परवडत नाही.त्यांच्यासाठी हे क्लिनिक दिलासा ठरेल.या रुग्णालयात अगदी कमी शुल्कात तृतीयपंथीयांच्या सर्व वयोगटातील रुग्णांचे उपचार करण्यात येतील. त्यांच्याकडून तपासणी शुल्क आकारण्यात येणार नाही. क्लिनिकमधील सर्व कर्मचारी हे तृतीयपंथी असतील, असेही त्यांनी सांगितले. संचेती रुग्णालयाजवळील तुपे इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हे क्लिनिक सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, एलजीबीटी सीबीओ आणि समुदाय यांच्या सहकार्याने आणि अभिमत विद्यापीठांची वैद्यकीय महाविद्यालये, हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या भागीदारीतून याठिकाणी आरोग्य सुविधा मिळणार आहेत.