शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (22:54 IST)

राज्यात कोरोना विषाणूची 9489 नवीन प्रकरणे,24 तासांत 153 रुग्णांचा मृत्यू

राज्यात शनिवारी कोविड -19 ची 9489.नवीन प्रकरणे आली आणि 153 लोकांचा मृत्यू झाला तर आणखी 8395 लोक संसर्गातून मुक्त झाले. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. एका निवेदनात म्हटले आहे की राज्यात संक्रमणाच्या नवीन घटनांसह संक्रमित लोकांची संख्या वाढून 60,88,841 आणि मृतांचा आकडा 1,22,724 झाला आहे. 
 
राज्यात 58,45,315 लोक बरे झाले असून 1,17,575 लोकांवर उपचार सुरू आहेत. राज्यात संसर्ग झालेल्या रुग्णां बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 2.01 टक्के आहे. आरोग्य विभागाने सांगितले की गेल्या  24 तासांत 2,24,374 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण4,23,20,880 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. 
 
 
मुंबई विभागात 1822 लोकांमध्ये संक्रमणाची पुष्टी झाली आणि 65 लोकांचा मृत्यू झाला आहे.यासह संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 16,01,128 आणि मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या 32,250 वर गेली आहे.अहमदनगरमधील 379 नवीन घटनांसह नाशिक विभागातून 617 प्रकरणे समोर आली आहेत. सातारा जिल्ह्यात 919 आणि पुणे शहरात 779 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर विभागातून 3423 आणि औरंगाबाद विभागातील 145 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी लातूर विभागात 210,अकोला विभागात 92 आणि नागपूर विभागात 88 नवीन रुग्ण आढळले.