रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (22:09 IST)

धनंजय मुडेंनी कवितेतून अजित पवारांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस  साजरा होत आहे. यामध्ये अजित पवारांचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडेंनी खास कविता म्हणून अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
'बोले तैसा चाले' ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजित पवार यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना!, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केले आहे. तसेच, आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओतून अजित पवार यांच्यासाठी एक कविताही मुंडेंनी म्हटली आहे. 
 
धनंजय मुडेंनी भावनिक शब्दांत कवितेच्या माध्यमांतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसादिनी अजित दादांबद्दल अनेक लेख वर्तमानपत्रात छापून येतील, पण मी कवितेतून दादांना शुभेच्छा देत आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, कवितेचं वाचनही केलंय. 
 
मित्र कोण आणि शत्रू कोण कधीच साधे कळले नाही
नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही
सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही
ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही
केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळलो नाही
सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून पळलो नाही
पचवून टाकले दु:ख सारे, कधीच मी हरळलो नाही
आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही 
कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही 
रुसून राहिले अगदी माझ्या जवळचेच, मी कुणाला कळलोच नाही
धनंजय मुंडेंनी अशा भावनिक कवितेतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कवितेच्या कविचं नाव मी घेणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.