बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 22 जुलै 2021 (09:07 IST)

Ajit Pawar Birthday | वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अजित पवार यांनी कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला अजित पवार यांच्यासोबत वैयक्तिक फोटो काढण्याची संधीही देण्यात आली. अजित पवार यांच्या कार्यालयात कामे तात्काळ मार्गी लागतात, कारण तिथं टीमवर्क म्हणून काम केलं जातं. अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कामाला तिथं प्रतिष्ठा आहे. 
 
कार्यालयासाठी प्रत्येक जण आणि त्याचं काम महत्वाचं आहे याची प्रचिती अजित पवार यांच्या वागणुकीतून सातत्यानं येते. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या स्टाफशी केलेल्या प्रेमाच्या संवादातून, वागणुकीतून त्याची अनुभूती पून्हा एकदा आली.
 
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी ही योजना आहे.
 
अजित पवारांचा प्रवास
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
नाव : अजित अनंतराव पवार
जन्म : 22 जुलै 1959.
जन्म ठिकाण : देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
शिक्षण : बी. कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा
अपत्ये : एकूण 2 (दोन मुले)
व्यवसाय : शेती
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मतदारसंघ : 201-बारामती, जिल्हा पुणे.
 
इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई : 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ; 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
 
28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री : 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री : 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.