Eleanor Catton Wins man Booker Prize for the Luminaries | एलिनॉर यांना बुकर पुरस्कार
WD |
ज्युरी प्रमुख असलेले रॉबर्ट मॅकफार्लेन यांनी एलिनॉर यांच्या 848 पानांच्या कादंबरीची खूप स्तुती केली आहे. ते म्हणाले की, ‘द लुमिनरीज’ ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. याची रचना अद्भुत आहे. या कादंबरीची कथा आपल्याला खिळवून ठेवते. सोने आणि लालसा याचे सर्वोत्तम वर्णन या कादंबरीमध्ये केले आहे.
पन्नास हजार पौंडचा हा पुरस्कार जिंकल्यानंतर एलिनॉर यांनी प्रकाशकांचे आभार मानले आहेत. त्यांनी मला लिखाणाचे स्वातंत्र दिल्यानेच, मी एवढे चांगले लिखाण करू शकले, असे त्यांनी म्हटले आहे.
या पुरस्काराच्या अंतिम शर्यतीत भारतीय वंशाची अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी यांच्या ‘द लोलॅड’ या पुस्तकाचाही समावेश होता.
