- धर्म
» - धर्मयात्रा
» - धर्मयात्रा लेख
अमृतसरचे सुवर्णमंदिर
प्रकाशपर्वाच्या शुभप्रसंगी वेबदुनिया परिवाराकडून आमच्या सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा...!! या शुभमुहर्तावर 'धर्मयात्रा' सदरात आम्ही वाचकांना 'अमृतसरच्या सुवर्णमंदिराची सहल घडवणार आहोत. अमृतसर शहरास सुवर्णमंदिराने जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली आहे. सुवर्णमंदिर म्हणजे शीख धर्मातील सर्वांत पवित्र गुरूद्वारा आहे. सोळाव्या शतकात शीखांचे चौथे गुरू रामदास यांनी एका तलावाच्या किनारी वास्तव्य केले होते. त्या तलावाच्या पाण्यात एक अद्भूत शक्ती होती. यावरून शहराचे अमृत+सर (अमृताचे सरोवर) हे नांव प्रचलित झाल्याचा इतिहास आहे. गुरू रामदासांनी तलावाच्या मध्यभागी एक मंदिर बांधले. तेच आज सुवर्णमंदिर या नावाने ओळखले जाते. येथे एप्रिल महिन्यात बैसाखी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. गुरू गोविंदसिंगांनी याच दिवशी खालसा पंथाची स्थापना केली होती. देशाच्या कुठल्याही कानाकोपर्यात राहणारा शीखधर्मीय आयुष्यात एकदा तरी या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येथे येतो. शिखांचे चौथे गुरू रामदाससाहेब यांच्या मनात