लखनौतील केसरबाग हा भाग नेहमी गर्दीने फुललेला असतो. या गर्दीच्या ठिकाणी हजारो बर्ष जुने असलेले बटूक भैरव नावाचे मंदिर आहे. बटूक भैरव सुरांचा राजा असल्याचे मानले जाते. दरवर्षी हजारो लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. ते आपला नवस, कला आणि संगीताची सुरवात येथूनच करतात. लखनौच्या कथक घराण्याने याच ठिकाणी आपल्या पायात घुंगरू बांधून कथक नृत्याचे शिक्षण घेतले. हे एक साधना केंद्र आहे.
भाद्रपदातील चौथ्या रविवारी येथे घुंगराची रात्र साजरी केली जाते. कारण याच दिवशी बटूक भैरवाचा आशीर्वाद घेऊन साधना सुरू केली जाते. या मंदिरातील भैरवाला सोमरस (मद्य) प्रिय असल्यामुळे भक्त उत्तम ब्रँडची इंग्लिश दारू बाबाला प्रसन्न करण्यासाठी चढवतात. भाद्रपदातील चौथ्या रविवारी येथे जत्रा भरते. सध्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे. मध्यंतरीच्या काळात कथ्थक घराण्यातील घुंगरू हरवले होते. परंतु 33 वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांचा सूर ऐकायला येऊ लागला आहे.
ही जत्रा इतर जत्रांपेक्षा वेगळी असते. रहाट पाळण्यात बसलेली लहान लहान मुले आणि लाकडाच्या पाळण्याचा चिरर्-चिरर् या आवाजाने वातावरण रहस्यमय बनते. दर्शनासाठी सामान्य लोकांबरोबरच जटाधारी साधुंचीही गर्दी असते. विविध प्रकारची दारू या मंदिरात चढविली जाते आणि तीच दारू प्रसाद म्हणून लोकांना वाटली जाते. मंदिर परिसरात दारूचा वास घेत फिरत असलेले कुत्रेही मोठ्या प्रमाणावर दिसतात. गारूडी बेधुंद होऊन पुंगी वाजवत बसलेले असतात. त्या पुंगीच्या तालावर फणा काढून डोलतात. नाग चबुतर्यावरही दिसतात. म्हणूनच भक्तांची श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे न उलगडणारे कोडे आहे.
या मंदिराला दोनशे वर्षाचा इतिहास असून येथे
WD
WD
बटूक भैरव बाल रूपात विराजमान असल्याचे इतिहासकार योगेश प्रवीण यांनी सांगितले. भैरवाला लक्ष्मणपूरचा राखणदार असेही म्हटले जाते. या भैरवाची उपासना दु:ख, संकटे दूर करण्यासाठी केली जाते. मंदिरातील मूर्ती 1000-1100 वर्ष इतकी जुनी असून त्याकाळात गोमती नदी या मंदिराजवळून वाहत होती. त्याच्याजवळच स्मशानभूमी होती. या मंदिराचा जीर्णोद्धार बलरामपुर इस्टेटच्या महाराजांनी केला होता.
WD
WD
अलाहाबाद जिल्ह्यातील हंडीया गावातील मिश्रा कुटूंब येथे आले आणि त्यांनी कथकाचा वृक्ष लावला. या घराण्यातील कालका-बिंदादीनच्या वाड्यामागे हे मंदिर आहे. भैरव प्रसाद म्हणून कालका बिंदादीन घरातील राममोहन आणि कृष्णमोहन यांचे घुंगरू बांधले आहेत. भाद्रपदातील चौथ्या रविवारी येणार्या यात्रेची उत्सुकता येथील लोकांमध्ये असते. त्याला मोठा रविवार किंवा घुंगराची रात्र असेही म्हणतात. कालका-बिंदादीन यांचे घर हे आजही कथक शिकणार्यांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. आजही या मंदिरात लखनौ घराण्यातील सर्व दिग्गज नर्तकांचे घुंगरू बांधले आहेत.
'चले गए दिल के दामनगीर' या सूरदासाच्या पदावर महाराजांसमोर नृत्य सादर करण्यात येत असे. याच दिवशी उस्ताद आपल्या शिष्यांना घुंगरू बांधून त्यांच्या कला शिक्षणाचा श्रीगणेशा करतात. दमयंती जोशी येथे आल्या होत्या तेव्हा सर्वप्रथम वाड्यावर येवून त्यांनी मंदिराचे दर्शन घेतले होते.
यावर्षीच्या 23 सप्टेंबरला येथे यात्रा भरली होती. 1974 पासून मंदिरात घुंगरू बांधण्याची परंपरा बंद झाली होती. परंतु, यावेळी लच्छू महाराज यांची शिष्या कुमकुम आर्दश आणि त्यांच्या शिष्यांनी भाद्रपदातील चौथ्या रविवारी आपल्या कलेचे प्रदर्शन करून आपल्या शिष्याला घुंगरू बांधले. या कार्यक्रमानिमित्त महापौर डॉ. दिनेश शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.
सध्या कालका-बिंदादीन वाड्यात तालीम जेथे दिली जाते तो भाग तुटलेला आहे. थोड्या दिवसांपूर्वीच कथक गुरू बिरजू महाराज यांनी वाड्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी सरकारकडे मागणी केली होती.
मंदिराच्या शेजारी राहणारे सेवानिवृत्त कर्नल
WD
WD
विष्णू श्रीवास्तव यांनी या मंदिरात के. एल. सहगल सितारा देवीला आपण कला सादर करताना पाहिले आहे. मंदिर व्यवस्थापक साधू शाम किशोर सांगतात की, बटूक भैरव सुरांचा राजा आहे. ते स्वरलहरी आहेत. त्यांना लहर येते. ते स्वत: भैरवाला सोमरस (मद्यपान) मोठ्या आनंदाने करतात. बटूक भैरवाला प्रसन्न करण्यासाठी किशन महाराज, बिस्मिल्ला खान, हरीप्रसाद चौरासिया, बफाती महाराज आदी बड्या हस्ती आल्या होत्या.