1 एप्रिलपासून जीएसटी नाही
गुड्स एंड सर्व्हीस टॅक्स म्हणजे GST येत्या 1 एप्रिल 2010 पासून सुरू होऊ शकणार नसल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे. याबाबत GST शी संबंधितांमध्ये एकमत न बदल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्राला करांच्या जाळ्यातून काढण्यासाठी सरकारने जीएसटी फॉर्मूला तयार केला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून याबाबत चालत असलेल्या बैठकांनंतरही या फॉर्मुल्यावर अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे. आतापर्यंत एक एप्रिलपासून GST लागू करण्याचा दावा करणा-या केंद्र सरकारने त्यासाठी उशीर होण्याचे संकेत दिले आहेत.