जीडीपीने सावरला बाजार
जीडीपी दरात सकारात्मक वाढ झाल्यानंतर आज मुंबई शेअर बाजारात दणक्यात वाढ झाली. दुबईतील आर्थिक संकटांच्या बातम्यांनी मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली होती.
सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ दिसून आली आहे. विकास दर सहा ते सात टक्के राहील असी अपेक्षा वर्तवली जात असतानाच विकास दराने 7.9 चा टप्पा गाठल्याचे सरकारने जाहीर करताच आज बाजार उसळला.
बीएसईचा निर्देशांक 294 अंशांनी वाढत 16926.22 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 91 अंशांनी वधारत 5032.70 अंशांवर बंद झाला.
बाजार उघडताक्षणीच आज बाजारात वाढ दिसून आली होती. शुक्रवारी बाजारात घसरण झाल्यानंतर सरकारतर्फे दुबई संकटाचा कोणताही परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज बाजारात वाढ दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली जात होती.