संबंधित माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश; नम्रता आणि क्षमाशीलता ही माणसाची खरी रत्ने
- विमानात २३० प्रवासी ८ तास अडकून पडले! अमेरिकेला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतले
- रेल्वे स्टेशनवर वडा पाव आणि डोसा सध्या तरी महाग होणार नाहीत; रेल्वेने दरवाढ पुढे ढकलली; प्रवाशांना मोठा दिलासा
- पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
- पत्नीचा कुजलेला मृतदेह बाथरूममध्ये आढळला; त्याच घरात 'लिव्ह-इन पार्टनर'सोबत राहत होता पती
भारतात प्लास्टिकच्या नोटा येणार
देशातील रोख रकमेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटा छापण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अशी माहिती समोर आली आहे. तसेच या नोटांच्या टिकाऊपणामुळे आणि कमी उत्पादन खर्चामुळे हे पाऊल उचलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाटणा आणि मुंबई येथे झालेल्या मध्यवर्ती बँकेच्या गेल्या दोन संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली. पॉलिमर नोटांच्या टिकाऊपणामुळे आणि कमी उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेतला जात आहे. सर्वसामान्यांसाठी प्लास्टिक नोटांच्या वापराचा एक प्रायोगिक प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच कागदी नोटा जास्त काळ टिकत नाहीत, त्यामुळे त्यांची गुणवत्ता मूळ कागदापेक्षा आणि मळलेल्या नोटांपेक्षा कमी असते. आरबीआयच्या (RBI) एका अहवालानुसार, केवळ २०२४-२५ या आर्थिक वर्षात अंदाजे २३.८ अब्ज रुपयांच्या नोटा नष्ट करण्यात आल्या व जे मागील वर्षाच्या २१.२४ अब्ज रुपयांच्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी अधिक आहे. यापैकी सर्वाधिक नोटा ५०० आणि १०० रुपयांच्या होत्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नष्ट करणे आणि नवीन नोटा छापण्यामुळे सरकारी खर्चावर मोठा भार पडतो.
Edited By- Dhanashri Naik
