संबंधित माहिती
- रेल्वे स्टेशनवर वडा पाव आणि डोसा सध्या तरी महाग होणार नाहीत; रेल्वेने दरवाढ पुढे ढकलली; प्रवाशांना मोठा दिलासा
- पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
- पत्नीचा कुजलेला मृतदेह बाथरूममध्ये आढळला; त्याच घरात 'लिव्ह-इन पार्टनर'सोबत राहत होता पती
- भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ६६ पद्म पुरस्कार प्रदान करणार
विमानात २३० प्रवासी ८ तास अडकून पडले! अमेरिकेला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतले
तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिघाडामुळे २३० प्रवासी जवळपास आठ तास अडकून पडले होते. या बिघाडामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानाला दिल्लीला परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार भारतातून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या वृत्तानुसार, आठ तासांहून अधिक काळ हवेत राहिल्यानंतर विमान दिल्लीला परत आणण्यात आले. प्राथमिक वृत्तानुसार, सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात अंदाजे २३० प्रवासी होते. बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर विमान राष्ट्रीय राजधानी दिल्लीला परत आणण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik