- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - शेअर बाजार
बाजारात तेजी कायम
बाजारात अखेरच्या क्षणी विक्रीचा जोर वाढल्यानंतरही आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत बंद झाला. बीएसई 107 अंशांनी वधारत 16,123 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 22 अंशांनी वाढत 4,805 अंशांवर बंद झाला. बाजारात सुरुवातीला तेजीत असणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी 0.42 आणि 0.15 टक्क्यांची घसरण दिसून आली. बाजारात तेजीत आलेल्या कंपन्यांमध्ये हिंडाल्को, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टरलाइट इंडस्ट्रीज, नाल्को, आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचा समावेश होता. टाटा पावर, एक्सेस बँक, हिंदुस्तान यूनिलिव्हर, मारुती आणि महिंद्रा एंण्ड महिंद्राच्या शेअर्समध्ये पडझड दिसून आली.