शेअर बाजारात घसरण
दिवसभर सापशिडीचा खेळ खेळल्यानंतर आज मुंबई शेअर बाजार घसरत बंद झाले. अमेरिकेतही बाजारात सलग दोन दिवस पडझड झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आज बीएसईचा निर्देशांक 88.43 अंशांनी घसरत 16,693 अंशांवर बंद झाला. निफ्टी 27.60 अंशांनी घसरत 4,958 अंशांवर बंद झाला.
छोट्या आणि मध्यम शेअर्समध्ये मात्र आज समाधानकारक कामगिरी दिसून आली. मिडकॅप निर्देशांकात 0.65, स्मॉलकॅप निर्देशांकात 0.91 टक्क्यांची वाढ दिसून आली.