1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात वाढ कायम

बुधवारी बाजारात दणक्यात वाढ झाल्यानंतर आजही बाजारात ही वाढ कायम दिसून येत आहे. बीएसईचा निर्देशांक सुरुवातीलाच 64 अंशांनी वाढत 17,295 अंशांवर गेला आहे, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 17 अंशांनी वधारत 5,162 अंशांवर गेला आहे.

मंगळवारी अमेरिकी बाजारात तेजी दिसून आल्यानंतर भारतीय बाजारही वधारले होते. बुधवारी मात्र बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला होता. आज बाजार उघडताक्षणीच यात वाढ दिसून येत असून, शुक्रवारी ख्रिसमस निमित्त शेअर बाजार बंद राहणार असल्याने आज या आठवड्यात बाजाराचा अखेरचा दिवस आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा