- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - गोडधोड
ड्राय फ्रूट केक
लागणारे जिन्नस: 100
ग्रॅम मैदा, 25 ग्रॅम तूप, 50 ग्रॅम दळलेली साखर, 1/2 चमचा सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1 चिमूट सायट्रिक ऍसिड, 50 ग्रॅम कापलेले ड्राय फ्रूट(मनुके, बदाम, काजू इत्यादी), 2 थेंब व्हेनिला इसेंस, 100 ग्रॅम दूध.करावयाची कृती:मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा मैदा गाळायच्या गाळणीने दोन ते तीन वेळा गाळून घ्या. एका बाऊलमध्ये तूप आणि साखर हलके होईस्तोवर फेटा. नंतर त्यात दूध आणि मैदा हळू-हळू हाताने हालवत टाका. ड्राय फ्रूट आणि इसेंस टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी ठेवून द्या. 20-25 मिनिटांनी सुरी टाकून पाहा. केक सुरीला चिपकला नसेल तर केक तयार झाला असे समजा. आइसिंग करून सर्व्ह करा.