लागणारे जिन्नस: 1 कच्चे नारळ, 4-5 हिरव्या मिरच्या, 1/2 वाट्या दही, 2चमचे मोहरी, अद्रक, 2 चमचे तेल, कढीपत्ता, चवीनुसार मीठ. करावयाची कृती: प्रथम नारळ फोडून त्याचे पातळ काळ करा. मिक्सरमध्ये नारळाचे काप, मिरची, अद्रक टाकून जाडसर वाटून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता टाकून तयार केलेले मिश्रण टाका. कमी आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. त्यानंतर गॅसवरून उतरवून दही टाकून हालवून घ्या. ही चटणी इडली, डोसे, वडा सांभार सोबत सर्व्ह करा.