1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

बटाट्याचे पॅटीस

बटाटे
साहित्य-- 250 ग्रॅम बटाटे उकडलेले, 2 मोठे चमचे ब्रेडचा चुरा.

NDND
सारणाचे साहित्य-- 100 ग्रॅम चण्याची डाळ, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2-3 चमचे कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली हिरवी कोथ‍िंबीर, एक छोटा चमचा तेल, 1 कप पाणी.

कृती-- उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या. चण्याची डाळ एक कप पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा व उकळवून घ्या. किसलेल्या बटाट्यात ब्रेडचा चुरा मिक्स करून घ्या. आतल्या सारणाचे मिश्रण तयार करण्यासाठी चण्याची डाळ व सर्व साहित्य मिक्स करून घ्या. हाताला तेल लावून पॅटिसचा आकार द्या. ओव्हनमध्ये 250 डिग्री सेल्सिअसवर 25 ते 30 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत शेका. हिरवी चटणी व सॉससोबत सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा