1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. arun jetali

पाय घसरुन पडले अरुण जेटली

arun jetali
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पाय घसरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. याबाबत प्रसारित झालेल्या वृत्तांनुसार, जेटलींच्या डोक्याला मार लागल्यानंतर ते काहीसे बेशुद्ध देखील झाले.
 
या घटनेनंतर पतंजली योगपीठातील डॉक्टरांनी जेटलींवर तातडीने उपचार केले. त्यांची तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. पतंजली योगपीठातील डॉक्टरांनी केलेल्या उपचार आणि तपासणीनंतरच जेटली दिल्लीला रवाना झाले. भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला जेटली यांना उपस्थित राहायचे आहे. आता जेटली यांची तब्येत ठणठणीत असल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. असे असले तरी ते आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभागी होऊ शकतील की नाही याबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.
 
 
पुढील लेख
अमेरिकेत मुस्लीम समजून भारतीयांचे स्टोर जाळण्याचा प्रयत्न