1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. आंदोलन पटेलांच्या येणार अंगलट?

आंदोलन पटेलांच्या येणार अंगलट?

पटेल समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू केलेले आंदोलन हार्दिक पटेल यांना अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना आता पटेलांकडूनच मोठा विरोध होत आहे. सरदार पटेल गटाचे ज्येष्ठ नेते लालजी पटेल यांना हार्दिक यांचे नेतृत्व पटेल मान्य नसल्याने दोन गटांमध्ये फूट पडली आहे. पटेल समाजाने अहमदाबाद येथे हार्दिक यांच्या पुतळ्याचे जाहीर दहनही केले.

आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठीच्या बैठकीमध्ये आणि पटेल पंचायत आयोजित करण्यास हार्दिक यांना मनाई करण्यात आली आहे. पंचायतीचा नियम मोडल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.