1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. आंध्रात रेल्वे अपघात; आमदारासह पाच ठार

आंध्रात रेल्वे अपघात; आमदारासह पाच ठार

#marathinews #MarathiNewsinwebdunia   #LatestNewsInMarathi  #MarathiSamachar  #मुख्य बातम्या #ताज्याबातम्या  #मराठी वृत्तपत्र #वृत्त जगत #महाराष्ट्र
अनंतपूर- बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला ट्रकची धडक बसून झालेल भीषण अपघातात कर्नाटकच्या आमदारासह पाचजण ठार तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्हय़ात हा अपघात झाला.
 
अनंतपूर जिल्हय़ातील मदाकिसरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला ग्रॅनाईट घेऊन जात असलेल्या ट्रकने धडक दिली. एक्स्प्रेसच्या एच-1 डबला ट्रकने जोरात धडक दिल्याने दोन बोग्या रुळावरून उतरल्या. या अपघातात कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार ए. ए. व्यंकटेश नाईक यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला. नाईक हे कर्नाटकातील राचूर जिल्हय़ातील देवदुर्ग मतदारसंघाचे आमदार होते. 
 
ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी व बचाव पथकाच अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत.