1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (09:57 IST)

उद्योगांनी गुंतवणूक वाढवावी : मोदी

narendra modi
नवी दिल्ली- देशामधील उद्योगपतींनी आणि कारखानदारांनी गुंतवणूक वाढवावी आणि बेरोजगार तरुणांना काम मिळवून द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपती व कारखानदारांच वार्षिक सभेमध्ये बोलताना केले आहे. या बैठकीला उद्योग क्षेत्रातील प्रमुख मंडळी व उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि त्यांनी मोदी यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला. या परिषदेला उपस्थित असलेला गुंतवणूकदारांनी आणि उद्योगपतींनी सरकारी व खासगी सेवा संघ मोठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.