Last Modified: पुणे , सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (10:31 IST)
एफटीआयआयचे ‘महाभारत’ अखेर संपले
एफटीआयआयप्रश्नी तोडगा काढण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने चचेर्चे आमंत्रण दिले आणि या आमंत्रणाचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांनाही आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केल्याने या ‘महाभारतातील’ एक भाग संपला आहे.
अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन तीव्र करीत गत १८ दिवसांपासून आमरण उपोषण आरंभले होते. मात्र रविवारी अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एफटीआयआय विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी रंजित नायर यांनी याबाबतची घोषणा केली. सरकारचे चचेर्चे निमंत्रण मान्य करीत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गत १८ दिवसांपासून आरंभलेले आमरण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने चचेर्साठी बैठक व तारीख निश्चित केल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी शनिवारी विद्यार्थ्यांनी दर्शविली होती. यानंतर सरकारनेही तातडीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चचेर्ची तयारी दर्शवीत तसा प्रस्ताव दिला.