1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. दाऊदला भारतात आणणारच : राठोड

दाऊदला भारतात आणणारच : राठोड

मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला काहीही झाले तरी पकडून भारतात आणले जाईल, असा दावा केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड  यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारताचे शत्रू कोठेही असले तरी आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमवरही आम्ही लक्ष ठेऊन आहोत. 

साम, दाम, दंड आणि भेद या सर्वांचा वापर करावा लागला तरी चालेल पण, दाऊदला आम्ही भारतात आणणारच, असा दावा राठोड यांनी केला.