1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
  4. पाककडून गोळीबारी सुरूच, 5 जण जखमी

पाककडून गोळीबारी सुरूच, 5 जण जखमी

Marathi Samachar
पाकिस्तानचा खोडसाळपणा अद्यापही सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून जवळपास 60 ते 65 भारतीय चौक्यांवर गोळीबारी केली जात आहे. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच सर्व काही ठिक होईल, असे ही मोदी म्हटले आहे.
 
दरम्यान, जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील 60 पोलिस चौकी आणि 80 गावांना पाकिस्तानी रेंजर्सनी टार्गेट केले आहे. यामध्ये तीन लोक जखमी झाले आहेत.
 
सीमेवर पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सैन्यदलाला सुट दिली आहे. पंतप्रधानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्याकडे देण्यात आली आहे.   
About Writer
wd