बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद...
पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान ५ नोव्हेंबर रोजी पार पडणार. ८ तारखेला मतमोजणी होून निकाल जाहीर होईल - निवडणूक आयोग
- २० ऑक्टोबर रोजी पार पडणार तिस-या टप्प्यासाठी मतदान, तर १ नोव्हेंबर रोजी होणार चौथ्या टप्प्यातील मतदान - निवडणूक आयोग
- दुस-या टप्प्यातील मतदान शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी पार पडणार - निवडणूक आयोग.
- पहिल्या टप्प्यातील निवडणूक १२ ऑक्टोबर रोजी पडणार - निवडणूक आयोग.
- ५ टप्प्यांत पार पडणार बिहार निवडणूक - निवडणूक आयोग
- बिहार निवडणूक - ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे फोटो असणार - निवडणूक आयोग
- बिहार इलेक्शन - २४३ साधारण निरीक्षक तसेच ३८ पोलीसांचे निरीक्षक निवडणुकीवर लक्ष ठेवून असणार. पेड न्यूज किंवा तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग कटीबद्ध - निवडणूक आयोग
- बिहार इलेक्शन - निवडणुका शांतपणे पार पडाव्यात तसेच कुठलेही गैरप्रकार होऊ नये यासाठी सगळी उपाययोजना करण्यात येत आहे. समाजकंटक कोण आहेत, संवेदनशील भाग कुठले आहेत, मतं विकत घेण्यासाठी पैशाचा वापर कुठे होऊ शकतो, कुठे मद्य वाटलं जाऊ शकतं अशा सगळ्याचा अभ्यास करण्यात येत आहे. - निवडणूक आयोग
- बिहारमधील ३८पैकी २९ जिल्हे नक्षलग्रस्त असून, सर्व केंद्रांवर पॅरामिलिटरी फोर्सेस तैनात करण्यात येणार - मुख्य निवडणूक आयोग
- आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेऊनच बिहार निवडणुकीची तारीख ठरवण्यात आली आहे - मुख्य निवडणूक आयुक्त नसीम अहमद जैदी यांची माहिती.
- बिहारमध्ये आजपासून आचारसंहिता लागू होत आहे - निवडणूक आयोग.
- बिहार निवडणुकीसाठी एकूण २४३ मतदारसंघ असून ६.६८ कोटी मतदार आहेत - निवडणूक आयोग
- दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, बिहार निवडणुकीची तारीख थोड्याच वेळात होणार घोषित.