1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. भारत-पाकिस्तान सीमा भूकंपाने हादरली

भारत-पाकिस्तान सीमा भूकंपाने हादरली

भारत-पाकिस्तान सीमा मंगळवारी भूकंपाने हादरली. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी पहाटे चार वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे. भूगर्भात १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान, भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.