1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
  4. मायावती 'शी' की 'ही'हेच समजत नाही- शायना

मायावती 'शी' की 'ही'हेच समजत नाही- शायना

mayawati
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या स्त्री असण्यासंबंधी सवाल उपस्थित करून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी नव्या वादाला तोंड फोडले  आहे.
 
मायावती 'शी'आहेत की 'ही'हेच समजत नसल्याचे शायना एनसी यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटले आहे. एंटरेप्रोन्योर ऑर्गनायझेशनच्या (ईओ) एका कार्यक्रमात बोलत होत्या. 
 
राजकारणात महिलांचे स्थान या विषयावर मार्गदर्शन करताना शायना म्हणाल्या, राजकारण पुरुषप्रधान आहे. यावर ईओचे सदस्य जितेंद्र म्हणाले, राजकारणात महिला नेहमीच सक्षम राहिल्या आहेत. इंदिरा गांधी, जयललिता तसेच मायावती या सर्व राजकारणात बलाढ्य  ठरल्या आहे. त्यावर शायना म्हणाल्या, मायावती या शी आहेत की ही हेच समजत नाही. नंतर मात्र शायना यांनी सारवासारवही केली. राजकारणातील महिलांच्या स्थितीवर बोलायचे नाही. संसद आणि विधानसभेतील महिलांच्या संख्येविषयी सांगायचे आहे. राजकारणात  महिलांचे प्रमाण वास्तवात 33 टक्के नसल्याचेही शायना म्हणाल्या.
About Writer
wd