1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (12:29 IST)

संजय दत्तला पुन्हा पॅरोल मंजूर

sanjay datta
1993च्या बाँबस्फोटांमध्ये बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता त्यामुळे त्याला तीन वर्षांचीच शिक्षा भोगावी लागत आहे. आता त्याची परत ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. येत्या १-२ दिवसांत संजय पॅरोलवर बाहेर येईल.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या मुलीच्या नाकावर शस्त्रक्रिया असून त्यावेळी कुटुंबियांसोबत उपस्थित राहता यावे यासाठी संजयने पॅरोलसाठी (संचित रजा) अर्ज केला होता. प्रशासनाकडून तो अर्ज मंजूर झाला आहे.