1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

गुगलही देणार मोबाइल मेसेजिंग अँप

google mobile messaging application
ग्राहकांना मोबाइलवरून मेसेजिंग आणि चॅटिंग सुविधा देणारे ‘मोबाइल मेसेजिंग अँप’ गुगलही उपलब्ध करून देणार आहे. मात्र हे ‘अँप’ कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचे नाव काय असेल; हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

गुगलची प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकच्या सुविधांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने गुगलने हे ‘अँप’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘अँप’मध्ये मेसेजिंग आणि चॅटिंगशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘नो-हाऊ’, इंटिग्रेटेड चॅटबोट्स आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी प्रणाली या ‘अँप’मध्ये उपलब्ध असणार आहे. फेसबुकच्या ‘व्हॉट्स अँप’ आणि मेसेंजर या सुविधांखेरीज टेनसेंटची ‘वी चॅट’ या सुविधा उपलब्ध आहेत. 
 
गुगलचदेखील ‘हँग आउट’ या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. गुगलच्या नव्या ‘अँप’मध्ये या सुविधांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे.