विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, हरमनप्रीत सिंग संघाचे कर्णधारपद भूषवणार
भारतीय हॉकी संघाने पुढील महिन्यात होणाऱ्या एफआयएच (FIH) हॉकी विश्वचषकासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार डिफेंडर हरमनप्रीत सिंग संघाचे कर्णधारपद भूषवणार असून, अनुभवी मनप्रीत सिंग मिडफिल्डची जबाबदारी सांभाळतील. तसेच हॉकी विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला भारतीय संघ आता नव्या आशेने मैदानात उतरत आहे. १९७५ मध्ये आपला पहिला आणि शेवटचा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाला यावेळी इतिहास रचण्याची संधी आहे. हॉकी इंडियाने २१ जुलै रोजी पुढील महिन्यात होणाऱ्या एफआयएच (FIH) पुरुष हॉकी विश्वचषकासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी डिफेंडर आणि स्टार ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग संघाचे नेतृत्व करतील.
तसेच २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारे हरमनप्रीत, या विश्वचषकातही देशाच्या आशांमध्ये एक प्रमुख खेळाडू असतील. दरम्यान, संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेला मनप्रीत सिंग मिडफिल्डची जबाबदारी सांभाळेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
गोलरक्षक: मोहित एचएस आणि सूरज कारकर
बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच
मिडफिल्डर: राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलकांत शर्मा आणि विवेक सागर प्रसाद
फॉरवर्डः दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग आणि अभिषेक.
Edited By- Dhanashri Naik

