स्मार्टफोन हँग होतोय का? तर करा एवढंच
आज स्मार्टफोनचा उपयोग एका कॉम्प्युटरप्रमाणे होतोय. फोन कॉल हा एक फीचर आहे पण यासारखे अनेक फीचर आता स्मार्टफोनमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन असलं की आणखी अँप्लिकेशन आपण फोनमध्ये वापरायला सुरु करतो. काही वेळेनंतर अँप्लिकेशन अधिक असल्याने फोन हँग होण्यास सुरुवात होते. फोन गरम होतो. त्यामुळे आपण फोन रिस्टार्ट करतो किंवा काही अँप्लिकेशन डिलिट करतो. एवढं सगळं करुनही फोन हँग होत असेल तर मग फोन रिसेट करण्याशिवाय इतर उपाय नाही. फोन रिसेट करणं एवढं कठीण नाही.
1. सगळ्यात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि प्रायव्हसी ऑप्शन सिलेक्ट करा.
2. यानंतर बॅकअप माय डेटा आणि ऑटोमेटिक रिस्टोर ऑप्शनवर टीक करुन मार्क करा. त्यामुळे तुमचा डेटा सेव्ह राहील.
3. टिकमार्क केल्यानंतर ङ्खॅक्ट्री डेटा रिसेट ऑप्शनवर क्लिक करा.
4. रिसेट केल्यानंतर तुमची पहिली स्क्रिन दिसेल. स्क्रिन अनलॉक करा.
5. आता तुम्ही तुमच्या फोनला रिसेट फोन पर्यायवर जाऊन रिसेट करु शकता.
