1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर

बाफ्टामध्येही ''जय हो''

लंडनमध्ये झालेल्या ब्रिटिश फिल्म एकॅडमी पुरस्कार सोहळ्यात 'स्लमडॉग मिलियनेर' ला तब्बल सात पुरस्कार मिळाले आहेत. हा 'बाफ्टा' पुरस्कार ऑस्करच्या तोडीसतोड मानला जातो.

रहमान यांना सर्वश्रेष्‍ठ संगीताचा तर रेसूल पुकोट्टी यांना सर्वश्रेष्ठ साउंड रेकॉर्डिंगचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाला 11 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले.'स्लमडॉग'ला सर्वश्रेष्‍ठ चित्रपट, डॅनी बॉयल यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक, सिमोन बीयूफोय यांना पटकथा, क्रिश डिकेंस यांना एडिटिंग आणि एंथनी डॉड मेंटल यांना सर्वश्रेष्‍ठ सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. रसूल यांना ऑस्कर मिळेल, अशी भविष्यवाणी बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली होती. त्यानुसार रसूल ऑस्कर पासून केवळ एक पाऊल दूर आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा