बेक्ड कॉर्न टोस्ट
ND
कृती : सर्वप्रथम ब्रेडला टोस्टरमध्ये थोडेसे भाजून घ्यावे. कढईत लोणी आणि मैदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा, सिमला मिरची घालून1 मिनिट भाजून घ्यावे. दूध घालून हालवतं राहावे, घट्ट होत आल्यावर त्यात कणसाचे दाणे, मीठ, काळेमिरे पूड घालून एकजीव करावे व कढई गॅसवरून खाली उतरवून घ्यावी. मिश्रण गार झाल्यावर टोस्ट केलेल्या ब्रेडवर एक मोठा चमचा हे मिश्रण पसरवून वर चीजचा किस करून त्यावर घालावे. ओव्हनमध्ये 100 डिग्री सेंटीग्रेड वर 10-12 मिनिट बेक करून बेक्ड कॉर्न टोस्ट सर्व्ह करावे.
