संबंधित माहिती
- आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आव्हान
- ठाकरेंच्या भेटीसाठी रजनीकांत मातोश्रीवर
- सीएम म्हणजे ‘करप्ट माणूस’म्हणून ओळख निर्माण झाली आहे-आमदार आदित्य ठाकरे
- शिवसेनेच्या शाखांवर कोणाचा हक्क? शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेंची शिवसेना-ठाकरे गटांत संघर्ष
- 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तरी पोराला मंत्री करायला नको होतं'-खासदार बंडू जाधव
मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीश संवाद साधत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
