1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. attack on BJP worker in Ulhasnagar

भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
भाजपच्या उल्हासनगरमधील कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. गुरदीप सिंग असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे.  शुक्रवारी रात्री उशिरा २० ते २५ जणांनी गुरदीप यांच्यावर तलवार आणि चॉपरने हल्ला केला.

गुरदीप या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेंट्रल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात उपचार सुरु आहेत. सदरचा हल्ला कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही.  पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
पुढील लेख
यशवंतराव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन