गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (14:48 IST)

पतीनेच खाऊ घातल्या गर्भपाताच्या गोळ्या, पत्नीचा मृत्यू

death
औरंगाबाद जिल्ह्यात धील फुलंब्री तालुक्यात गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या गोळ्या पतीनेच तिला या गोळ्या खाऊ घातल्याचं समोर आले आहे. वैशाली क्षीरसागर असं या महिलेचं नाव आहे, वैशाली यांचं बाळासाहेब क्षीरसागर या व्यक्तीसोबत गेले काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच वैशाली याना दिवस गेले. मात्र तिचे पती म्हणजेच बाळासाहेब यांना हे मूल नको होतं, आणि यासाठीच तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या,
 
पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला. त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं आणि यातच तिचा मृत्यू झाला .  यासंदर्भात पोलिसांना कळताच अधिक तपास करत पोलिसांनी राहत्या घरातून वैशालीच्या पती बाळासाहेब अटक केली आहे. आरोपी पतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor