1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:39 IST)

कांदा उत्पादक शेतकऱ्याचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

कांद्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल घेतली नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी घोषणा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली. याबाबतचं निवेदनही त्यांनी पवारांना दिलं.
 
शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जातंय, असं म्हणत तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी अर्धनग्न आंदोलन केलं आणि याबाबतचं निवेदन पवारांना दिलं.