रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:24 IST)

संजय राऊतांनी सामना वाचणे बंद केले आहे बहुधा, अतुल भातखळकर यांनी ट्विट केले

Atul Bhatkhalkar
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. तुरुंगात गेल्यापासून संजय राऊत यांनी सामना वाचणे बंद केले आहे बहुधा.उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा वारसा दाखवल्याबद्दल शरद पवार यांचे कौतुक केले आहे. ठाकरेंच्या सामनातील निवेदनात कुठेही मैदानात उतरण्याची भाषा नाही. त्यामुळे राऊत, अंधारे काय बरळतात त्याला काय किंमत आहे?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक आम्ही १०० टक्के जिंकणार होतो. पण यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी जेव्हा कुणा लोकप्रतिनिधीचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी रिंगणात उतरले असेल, तर भाजप उमेदवार देत नाही, ही आमची संस्कृती आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयानंतर स्पष्ट केले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor