गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (12:45 IST)

Thane : रिक्षावाल्याने मुलीला फरफटत नेले

The rickshaw
ठाणे : एका 21 वर्षीय तरुणीचा रिक्षा चालकाने वियनभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानक येथील बाजारपेठेत सकाळी उघडकीस आला. तरुणीने या रिक्षा चालकाला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याने तिला फरफटत काही अंतर पुढे नेले. त्यामुळे तरुणीला दुखापतही झाली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहे.  
 
ठाण्यात राहणारी तरुणी ही बाजारपेठ परिसरातून शुक्रवारी सकाळी 7 वाजता पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन बाजारपेठेतून जात होता. या रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरूणीने धाडस दाखवित रिक्षा चालकाला जाब विचारत तसेच त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले.तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्तात पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. तिने याप्रकरणाची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Edited by : Smita Joshi