सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (07:41 IST)

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा दणक्यात झाला

uddhav eaknath shinde
प्रमुख उद्धव ठाकरे  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले.
 
शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात ४० बंडखोर उभे करण्यात आले होते. तेव्हा तुम्ही काय करत होता? रमेश लटके हा आपला भाऊ गेलाय. त्याची विधाव पत्नी लढतेय. तिच्याविरोधात तुम्ही भाजपला साथ देत आहात आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहात? असा सवाल करतानाच बीकेसीत इव्हेंट करणारे तुम्ही हिंदुत्व जपणार? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालंय, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
 
 दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...
 
सुषमा अंधारेंच्या या टीकेवर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शिवतीर्थावर जो दसरा मेळावा झाला, त्यामध्ये कोणतरी ताई या बोलत होत्या. त्या ताईंना दोन-तीन महिन्यांआधी राष्ट्रवादीतून आयात करुन शिवसेनेत आणलं गेलं. या ताईंनी याआधी कधीही शिवसेनेचा झेंडा पकडला नसेल किंवा शिवसेनेच्या मेळाव्यात सामील झाल्या नाही. कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नाही. त्या ताई गेले २५ ते ३० वर्षे शिवसेनेसाठी अनेक केसेस अंगावल घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताय. त्यामुळे ताईंना कसं काय जमतं बुवा..,असा प्रश्न पडतो अशी टीका शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor