1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sixth standard student dies while playing football

फुटबॉल खेळताना सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थाचा फुटबॉल खेळताना मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. या घटनेत मैदानात खेळत असताना या विद्यार्थाला भोवळ आली. यानंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगम खिलेश्वर बोपचे या मुलाचे नाव असून तो फक्त 11 वर्षांचा असून तो गोंदियाच्या सोनी येथील रहिवासी होता. 
 
नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मित्रांबरोबर फुटबॉल खेळत होता. दरम्यान त्याला भोवळ आल्याने तो मैदानातच पडला. त्याला लगेच विद्यालयाच्या शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेण्यात आलं.
 
तिथे तपासणी करून त्याला साकोली येथील हृदयरोग तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Edited by : Smita Joshi
पुढील लेख
T20 World Cupच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला