मान्सून पुढील ४८ तासांत केरळमध्ये धडकणार
सध्या नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. काही दिवसांपासून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. आता हवामान बाबत चांगली बातमी आहे. नागरिकांची प्रतीक्षा संपली असून येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार आहे.
ALSO READ: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभाग आणि खाजगी सवामन संस्था स्कायमेट वेदर ने मान्सून बाबतचे संकेत दिले आहे. यंदा मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी विलंब झाला असून पुढील वातावरण अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील किमान एक आठवडा देशात कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
३ जून रोजी पर्वतीय भागांवर एक तीव्र पश्चिमी विक्षोभ सक्रिय होईल या मुळे ४ जून पर्यंत त्याचा प्रभाव वाढणार असून पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात २ ते ४ जून दरम्यान ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्ये २ आणि ३ जून रोजी मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ALSO READ: पालघरच्या उपसागरात हजारो मृत मासे आढळले
२ ते ६ जून दरम्यान या पर्वतीय राज्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit
