1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. शेतीला अखंड 12 तास वीज

शेतीला अखंड 12 तास वीज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यतल्या बर्‍याच भागात पावसाने दडी मारल्याने पिके करपत चालली आहेत, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना कृषीपंपांसाठी पुढील तीन महिने दिवसाच्या वेळी 12 तास अखंड वीज पुरवठा करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
 
पीकांना नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी उपलब्ध आहे मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसेल त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास, पीकांना फायदा होईल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तात्काळ उपलब्ध करुन द्या”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुढील लेख
#WebViral 8 मुस्लिमांनी केले हिंदू वृद्ध व्यक्तीचे अंतिम संस्कार