आफ्रिदीने जतन केली सचिनची बॅट
पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीद आफ्रिदीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट जतन करुन ठेवली आहे. या बॅटची लिलावात विक्री करण्यासाठी आलेले अनेक प्रस्तावही त्याने फेटाळले आहे.
सचिनची बॅट आफ्रिदीकडे वकार युनूसमार्फत पोहचली. वकारने ही बॅट आफ्रिदीला भेट म्हणून दिली होती. त्यावेळी ही बॅट सचिनची असून तुझ्यासाठी ती भाग्यशाली ठरले, असे वकाने त्याला सांगितले होते. त्यानंतर आफ्रिदीने ऑक्टोंबर 2006 मध्ये सचिनच्या बॅटने श्रीलंकेविरुध्द 37 चेंडुत शतक केले होते. एकदिवसीय सामन्यातील ते सर्वात वेगवान शतक होते.
आफ्रिदीसाठी खरोखर भाग्यशाली ठरलेल्या सचिनच्या बॅटची लिलावात विक्री करण्याचे अनेक प्रस्ताव त्याच्याकडे आले. परंतु ही माझी भावनात्मक गुंतवणूक असल्याचे सांगत सर्व प्रस्ताव फेटाळले.