छत्रपतींची दूरदृष्टी
- डॉ. सदानंद मोरे
WD |
महाभारतातही धर्माचा असाच अर्थ लावला गेला आहे, पण आज जाती-धर्माच्या नावावर राजकारण करताना याचा विसर आपल्याला पडला आहे. शिवाजी महाराज हे लष्करी तज्ज्ञ होते. युद्ध कशा प्रकारे खेळले पाहिजे, याची त्यांना जाण होती. केवळ शत्रू मुस्लिम समाजाचा आहे म्हणून त्यांनी मोगलांवर हल्ला केला नाही. त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम समाजाचे सैनिक होते त्याचप्रमाणे दलित समाजातील सैनिकही होते, पण आज जाती-धर्माच्या नावावर राजकारण करताना या गोष्टीचा आपल्याला विसर पडला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नीतीमत्ता, चारित्र्य आणि चांगली वागणून याच मूल्यांचा नेहमी महत्त्व दिले. युद्धशास्त्राच्या नियमांनुसार ते युद्ध खेळले. त्यांनी आपल्या वाटचालीत शत्रूच्या स्त्रियांनाही मोठा सन्मान दिला. त्यांच्या अनेक कामांची नोंद आज घेणे आवश्यक आहे. आज भ्रष्टाचार करून मोठं होण्याचा प्रयत्न करणार्या राजकीय नेत्यांनी शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेणे गरजेचे आहे.
